Blog Banner
2 min read

Vygr Maharashtra: सरकारच्या सरल पोर्टलमुळे मुंबईतील दहावीच्या विद्यार्थ्यांचे हे वर्ष धोक्यात?

Calender Jul 21, 2023
2 min read

Vygr Maharashtra: सरकारच्या सरल पोर्टलमुळे मुंबईतील दहावीच्या विद्यार्थ्यांचे हे वर्ष धोक्यात?

मुंबईतील कांजुरमार्ग येथे असणाऱ्या एका शाळेतील‌ सुमारे १०० विद्यार्थ्यांचे यंदाचे दहावीचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल, अशी भिती‌‌ पालकांनी व्यक्त केली आहे. सरकारच्या सरल पोर्टलच्या यंत्रणेतील बिघाडामुळे ह्या काही १०० विद्यार्थ्यांची गेल्या दोन वर्षांची गरजेची असलेली माहितीची पोर्टलवर नोंद झालेली नाही. ह्यांमुळे विद्यार्थ्यांना एसएससी परीक्षेचा फॉर्म भरण्यास अडचणी येऊ शकतात. 

कोविड महामारीच्या काळानंतर अनेक कुटुंबांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. त्याच दरम्यान बऱ्याच पालकांनी आपल्या मुलांचा सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतला. तेव्हा मुलांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून महत्त्वाचे असलेले ट्रान्स्फर सर्टिफिकेट अनिवार्य नसल्याचे सरकारने सांगितले आणि त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला गेल्या दोन‌वर्षात ट्रान्स्फर सर्टिफिकेट देण्यात आले‌‌ नाही. म्हणून सरल पोर्टलवर अद्याप विद्यार्थ्यांच्या नवीन‌ माहितीची नोंद झालेली नाही. 

कांजुरमार्ग मधील‌‌ नेहरुनगर येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या १०५ विद्यार्थ्यांची एका शाळेतून‌ दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्याची (transfer information) माहिती सरल‌ पोर्टलवर नसल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिका शैक्षणिक विभाग आणि महाराष्ट्र सरकार शैक्षणिक विभाग ह्यांनी लवकरच ह्या प्रकरणाची दखल‌ घेतली जाईल‌ असे सांगातले आहे. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान‌ होणार नाही ह्याची जबाबदारी शैक्षणिक विभागाने घेतली आहे. पण ह्या संपूर्ण प्रकरणात खाजगी शाळांचे सहकार्य खूप गरजेचे आहे. जोपर्यंत खाजगी शाळा त्यांच्या माहितीत बदल‌ करत नाहीत तोपर्यंत सरल पोर्टलवर ह्या विद्यार्थ्यांची नोंद करणे शक्य होणार नाही. खाजगी शाळा आणि शैक्षणिक विभागाच्या सहकार्याने १०५ विद्यार्थ्यांचे हे शैक्षणिक वर्ष सुरळीत होईल,‌अशी आशा‌‌ पालकांनी व्यक्त केली आहे. 

© Copyright 2023. All Rights Reserved Powered by Vygr Media

    • Apple Store
    • Google Play