Blog Banner
2 min read

Vygr Maharashtra: कोल्हापूरमधील राधानगरी धरण १००% भरल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Calender Jul 26, 2023
2 min read

Vygr Maharashtra: कोल्हापूरमधील राधानगरी धरण १००% भरल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जून महिना कोरडा ठप्प गेल्यानंतर आता जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात चांगलाच वर्षाव‌ केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सखल भागांमध्ये पाणी साचले असून‌ पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.‌ कोल्हापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे राधानगरी धरण १००% भरल्याची बातमी जिल्हा प्रशासनाने सांगातली आहे. धरण पूर्ण भरल्याने धरणाचे दोन दरवाजे क्रमांक ५ व‌ क्रमांक ६ आज २६ जुलै रोजी सकाळी ७ ते ९ दरम्यान उघडण्यात आले आहेत. साधारण २८२८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

ह्या धरणातील पाणी भोगावती नदीच्या पात्रात सोडले असून आसपासच्या नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गरज भासल्यास तेथील लोकांचे स्थलांतर करण्यात येईल असे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. धरण पाणलोट क्षेत्रात असलेल्या शाळांना दोन‌ दिवसांपूर्वी सुट्टी जाहीर केली तर एकूणच पावसाचा आणि पूराचा अंदाज घेऊन जिल्ह्यातील इतर शाळांना सुट्टी देण्याचे आदेश प्रशासनाकडून आले आहेत. 

भोगावती नदी आरे आणि चिखली ह्या दोन‌ शहारांशी संबंधित असून पंचगंगा नदी मुख्यतः आंबेवाडी, कोल्हापूर शहर, कसबा बावडा,‌ शिरोळ ह्या ठिकाणांच्या संपर्कात येते. पंचगंगा सुद्धा इशारा पातळीवर वाहत असून तिने धोक्याची पातळी ओलांडल्यास पूराचे पाणी जिल्हा प्रशासकीय कार्यालयात जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी कार्यालयातील कागदपत्रे हलवण्यात आली आहे. 

कोल्हापूर प्रशासन पूरमय परिस्थितीसाठी तयार असल्याची चिन्हे दिसत आहेत. 

© Copyright 2023. All Rights Reserved Powered by Vygr Media

    • Apple Store
    • Google Play